
अभिनेता हृतिक रोशन आणि अभिनेत्री सबा आझाद हे त्यांच्या नात्यामुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. या दोघांना सर्वांत पहिल्यांदा एका रेस्टॉरंटमधून बाहेर येताना पापाराझींनी पाहिलं. रेस्टॉरंटमधून बाहेर येताना हृतिकच्या हातात सबाचा हात होता. तेव्हापासून या दोघांच्या अफेअरच्या चर्चा सुरू आहेत.

हृतिकच्या कुटुंबीयांना सबा खूप आवडते आणि सबाच्या कामाचंही ते खूप कौतुक करतात, असं समजतंय.

नुकतीच सबा जेव्हा हृतिकच्या घरी गेली, तेव्हा तिने तिच्या गायनकौशल्याने सर्वांची मनं जिंकली होती.

हृतिक आणि सबाच्या लग्नाच्या चर्चा असतानाच हे दोघं सोशल मीडियावर एकमेकांचं मोकळेपणाने कौतुक करताना दिसतात.

हृतिक आणि सबा सोशल मीडियावर एकमेकांच्या पोस्टवर कमेंट करत असतात. काही दिवसांपूर्वी सबा जेव्हा हृतिकच्या कुटुंबीयांना भेटली होती, तेव्हा हृतिकच्या काकांनी तिचा फोटो शेअर केला होता.