
अभिनेता सलमान खान याच्या भाचीची भुमिका साकारणारी चिमुकली तिच्या क्यूटनेसमुळे तुफान चर्चेत आली होती. आज ती चिमुकली पूर्णपणे बदलेली आहे. वयाच्या 30 व्या वर्षी ती प्रचंड बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे.

सध्या ज्या चिमुकलीची चर्चा रंगली आहे, तिचं नाव झोया अफरोज आहे. झोया आता प्रचंड ग्सॅमरस आणि बोल्ड दिसत आहे. झोया सध्या मॉडलिंग विश्वात सक्रिय आहे.

झोया हिने मिस इंडिया इंटरनॅशनल 2021 किताब स्वतःच्या नावावर केला आहे. झोया मुळची लखनऊ येथील आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने मॉडलिंग क्षेत्रात पदार्पण केलं. झोया हिच्या सौंदर्यापुढे अनेक बॉलिवूड अभिनेत्री देखील फिक्या आहेत.

झोया हिने बालकलाकार म्हणून अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली आहे. कहो ना प्यार है, मन, कुछ ना कहो यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये झोया हिने भूमिका साकारली आहे.

आता झोया हिने ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण केलं आहे. ‘मत्स्य कांड' वेब सीरिजमध्ये झोया हिने भूमिका साकराली, झोया सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.