
आज 21 मे म्हणजेच आंतरराष्ट्रीय चहा दिवस आहे. चहा प्यायला कोणाला नाही आवडत. कंटाळा दूर करण्यासाठी अनेकजण चहा पितात तर काही जणांना फक्त चहा पिण्याचे कारण हवे असते. बाॅलिवूडमधील अनेक स्टार हे चहा प्रेमी आहेत.

करीना कपूर हिला चहा प्यायला प्रचंड आवडतो. करीना कपूर ही दररोज संध्याकाळी कायमच चहा पिते. अनेकदा चित्रपटाच्या सेटवरही करीना कपूर ही चहा पिताना दिसते.

यामी गौतम हिला देखील चहा प्रचंड आवडतो. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत यामी गाैतम हिने म्हटले की, ज्यावेळी मी सकाळी चार वाजता अभ्यासासाठी उठवत होते, त्यावेळी आई चहा तयार करत असत. आजही त्या चहाची आठवण येते.

माधुरी दीक्षित ही देखील चहाची मोठी फॅन आहे. माधुरी दीक्षित अनेकदा चित्रपटाच्या सेटवर चहा घेते. रिअॅलिटी शोमध्येही ब्रेकच्या वेळी अनेकदा माधुरी दीक्षित ही चहा घेताना दिसली.

दीपिका पादुकोण ही देखील चहा प्रेमी आहे. मात्र, दीपिका पादुकोण ही ग्रीन टीमध्ये दूध टाकून घेते. दीपिका पादुकोण ही दिवसातून अनेक वेळा ग्रीन टी घेते.