
नुकताच झालेल्या मुलाखतीत जान्हवी कपूर हिला 'सिचुएशनशिप'बद्दल विचारण्यात आलं. यावर अभिनेत्री म्हणाली, 'मला असं वाटतं की ही अर्थहीन गोष्ट आहे. तुम्हाला कोणी आवडत असेल किंवा नाही... पण तुम्हाला कमिट करायचं नसतं, पण त्या व्यक्तीसोबत तुम्हाला राहायचं असतं...'

'कधीच कोणीच असं कोणासोबत करायला नाही पाहिजे. कारण समोरचा व्यक्ती तुमच्यावर डोळे बंद करुन विश्वास करत असतो आणि त्या मुलीची फसवणूक होत असते. अशा नात्यावर मला विश्वास नाही...'

पुढे जान्हवी म्हणाली, 'ज्या मुली अशा नात्यात अडकल्या आहेत, त्यांनी आताच अशा लोकांना लाथ मारून आयुष्यातून बाहेर हकला...' असं देखील अभिनेत्री म्हणाली...

स्वतःबद्दल अभिनेत्री म्हणाली, 'मी आयुष्यात फक्त एकदाच आवडत्या व्यक्तीला गमावलं आहे आणि तीच व्यक्ती पुन्हा आयुष्यात नव्याने आली आहे. त्या व्यक्तीने पुन्हा आयुष्यात येवून सर्वकाही ठिक केलं आहे...'

जान्हवी कपूर हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं, शिखर याला अभिनेत्री डेट करत आहे. दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं. शिवाय अभिनेत्रीचे वडील बोनी कपूर यांनी देखील नात्याला परवानगी दिली आहे.