
कौन बनेगा करोडपतीच्या या हंगामातील पहिल्या करोडपती बनलेल्या हिमानी बुंदेलाची एक मोठी इच्छा नुकतंच पूर्ण झाली आहे. जेव्हा हिमानी शोमध्ये आल्या तेव्हा त्यांनी अमिताभ बच्चन यांच्या समोर सांगितलं की त्या जुबिन नौटियालच्या चाहत्या आहेत.

एवढंच नाही तर बिग बींनी हिमानी यांना शो दरम्यान जुबिनशी बोलणं करून दिलं. त्यावेळी जुबिननं हिमानीला भेटायला नक्कीच आवडेल असंही सांगितलं होतं. जुबिनशी बोलून हिमानी या खूप खूश झाल्या आणि त्यांनी बिग बींचे आभार मानले.

आता जुबिन आपलं वचन पूर्ण करण्यासाठी हिमानी यांच्या घरी पोहोचला आणि त्यानं हिमानीला आश्चर्यचकित केलं. जुबिनने हिमानीच्या बहिणीसोबत मिळून हे सरप्राईज प्लान केलं. तो एक पत्रकार म्हणून त्यांच्या घरी गेला आणि हिमानीशी बोलला.

या दरम्यान हिमानी म्हणतात की तिला जुबिनला भेटायचं आहे. मग जुबिन मुलाखतीच्या मध्यभागी गाणं सुरू करतो आणि हिमानीला आश्चर्य वाटतं की तिचा आवडता गायक तिच्या समोर बसला आहे.

हिमानीला भेटण्याबाबत जुबिन म्हणाला, हिमानीनं मला व्हॉईस नोट पाठवली तेव्हा मी खूप प्रभावित झालो. हिमानी आणि तिच्या कुटुंबाकडून मला खूप प्रेम मिळालं आणि सर्वांना भेटून मला खूप आनंद झाला.