
जय मेहता यांचे आजोबा यांनी 1940 मध्ये जे घर बांधलं होतं, त्या घरामध्ये जुही तिच्या कुटुंबासोबत राहते. अभिनेत्रीच्या घराचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

अभिनय विश्वात यशाच्या उच्च शिखरावर असताना अभिनेत्रीने जय मेहता यांच्यासोबत लग्न केलं. लग्नानंतर अभिनेत्री आनंदी वैवाहिक आयुष्य जगत आहे.

जुही चावला तिच्या मुंबईतील घरात कुटुंबासोबत राहते. जय मेहता यांच्या आजोबांनी 1940 मध्ये मलबार हिल्समध्ये हे घर विकत घेतले होते.

जुही चावला आता अभिनय विश्वात सक्रिय नसली तरी, कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आजही जुहीच्या चाहत्यांची संख्या कमी झालेली नाही.

जुही सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.