समुद्र किनारी नवऱ्यासोबत करीना कपूरचे खास क्षण, फोटो पोस्ट करत म्हणाली…

अभिनेत्री करीना कपूर कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत अभिनेत्री चाहत्यांच्या संपर्कात राहाण्याचा प्रयत्न करत असते. आता देखील अभिनेत्रीने पतीसोबत काही फोटो पोस्ट केले आहेत.

| Updated on: Jul 03, 2024 | 1:06 PM
1 / 5
अभिनेत्री करीना कायम पती सैफ अली खान आणि दोन मुलांसोबत फोटो पोस्ट करत असते. पण आता अभिनेत्रीने फक्त सैफ याच्यासोबत फोटो पोस्ट केला आहे.

अभिनेत्री करीना कायम पती सैफ अली खान आणि दोन मुलांसोबत फोटो पोस्ट करत असते. पण आता अभिनेत्रीने फक्त सैफ याच्यासोबत फोटो पोस्ट केला आहे.

2 / 5

करीना - सैफ त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत खास क्षणांचा आनंद लुटताना दिसत आहेत. सध्या सर्वत्र दोघांच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

3 / 5

पती सैफ अली खान याच्यासोबत फोटो पोस्ट करत करीना हिने कॅप्शनमध्ये, माझ्यासाठी तो फोटोबॉम्बर आहे... असं लिहिलं आहे. दोघांचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

4 / 5

2012 मध्ये सैफ आणि करीना यांनी लग्न केलं. त्याआधी दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये देखील राहिले होते. दोघां चाहत्यांना कायम कपल गोल्स देत असतात.

5 / 5

सैफ – करीना यांच्या मोठ्या मुलाचं नाव तैमूर अली खान तर लहान मुलाचं नाव जेह अली खान असं आहे. तैमूर आणि जेह देखील सेलिब्रिटी किड्स म्हणून प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us