
बॉलिवूड इंडस्ट्रीची गॉर्जियस डॉल कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांच्या अफेअरच्या बातम्या अनेकदा चर्चेत असतात. मात्र या दोघांनीही त्यांच्या नात्याबाबत कोणतीही माहिती दिली नाही. आता नवीन बातम्यांवर विश्वास ठेवला तर कतरिना आणि विकीच्या घरी लवकरच सनई चौघडा वाजणार आहे.

सूत्रांच्या हवाल्याने टीओआयमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, बॉलिवूडमधील लव्ह बर्ड्सपैकी एक असलेले कतरिना कैफ आणि विकी कौशल लवकरच एकमेकांशी लग्न करणार आहेत आणि कायमचा एकमेकांची साथ देणार आहेत.

रिपोर्टनुसार, कतरिना आणि विकीनेही त्यांच्या लग्नाची तयारी सुरू केली आहे. "कतरिना आणि विकीच्या लग्नाचे कपडे प्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्यासाची यांनी डिझाइन केले आहेत. ते सध्या कपड्यांसाठी फॅब्रिक निवडत आहेत," असं एका सूत्राने सांगितलं आहे.

सूत्रांनी पुढे सांगितलं की, "कतरिनाने रॉ सिल्क फॅब्रिक निवडले आहे. कतरिना आणि विकीचे लग्न नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये होणार आहे, ज्यामध्ये अभिनेत्री लेहेंगा घालणार आहे."

विकी कौशलनं मागच्या एप्रिल महिन्यात सोशल मीडियाद्वारे त्याच्या चाहत्यांना सांगितलं, की त्यालादेखील हा आजार झाला आहे आणि त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी चाचणी करण्याचं आवाहन त्यानं केलं होतं. त्याच्या एका दिवसानंतर, त्याची पत्नी आणि अभिनेत्री कॅटरिना कैफ हिलाही कोरोना विषाणूचा संसर्ग झाला होता.

विकी आणि कतरिना अनेकदा एकमेकांसोबत स्पॉट होतात. अलीकडेच हे दोघे विकी कौशलच्या सरदार उधम चित्रपटाच्या स्क्रिनिंगमध्ये दिसले होते.