
रोहित शेट्टीचा प्रसिद्ध रियॅलिटी शो ‘खतरों के खिलाडी 11’ 17 जुलै रोजी टीव्हीवर प्रसारित होणार आहे. या शोमध्ये प्रसिद्ध स्टार्स जबरदस्त स्टंट करताना दिसतील.

नुकतीच या कार्यक्रमाच्या टेलिकास्टच्या आधी एक पत्रकार परिषद घेण्यात आली होती, त्यात सर्व स्पर्धकांनी देखील हजेरी लावली होती. या दरम्यान ‘बिग बॉस 14’ फेम निक्की तंबोली एका खास स्टाईलमध्ये दिसली.

छोट्या पडद्यावर सोज्वळ सुनेची भूमिका साकारणारी दिव्यांकादेखील या कार्यक्रमाचा एक भाग असणार आहे. या दरम्यान, दिव्यंका अगदी ग्लॅमरस स्टाईलमध्ये दिसली. अभिनेत्रीच्या ब्लॅक आऊटफिटवर सगळ्यांच्याच नजर खिळल्या होत्या.

रोडीजसारख्या शोमध्ये आपला जलवा दाखवल्यानंतर आता वरुण सूद या शोमध्ये स्टंट करताना दिसणार आहे.

‘बिग बॉस’मध्ये यश मिळाल्यानंतर विशाल पुन्हा एका रिअॅलिटी शोचा एक भाग झाला आहे. या शोमध्ये विशालचे एक दमदार रूप चाहत्यांना पाहायला मिळणार आहे.

बर्याचदा धार्मिक कार्यक्रमांमध्ये कृष्णाची भूमिका करणारा अभिनेता सौरभ जैन याला स्टंट करताना पाहणे त्याच्या चाहत्यांसाठी खरोखर विशेष ठरणार आहे. या परिषदेत सौरभ स्टायलिश लूकमध्ये दिसला होता.

या खास प्रसंगी श्वेता तिवारीने आपल्या टोन बॉडीला फ्लाँट करण्यासाठी व्हाईट पेंट-सूट निवडला. यादरम्यान ती एका वेगळ्या लूकमध्ये दिसली.

‘बिग बॉस 14’चा फायनलिस्ट राहुल वैद्यची स्टाईल नेहमीच खास राहिली आहे. बातमीनुसार राहुल ‘खतरों के खिलाडी’तही अंतिम फेरी गाठेल.

अभिनेत्री अनुष्का सेनही यावेळी ‘खतरों के खिलाडी’चा भाग बनली आहे. तिचा स्टंट पाहण्यास चाहते देखील उत्सुक आहेत.

अभिनेत्री मेहक चहल या पर्वाचा एक भाग असणार आहे. यावेळी ती एक हॉट बाला बनून या कार्यक्रमात पोहोचली होती.

प्रसिद्ध छोट्या पडद्यावरील अभिनेता आणि होस्ट अर्जुन बिजलानीदेखील या कार्यक्रमाचा एक भाग असणार आहे. असे म्हटले जात आहे की, अर्जुनच या पर्वाचा विजेता ठरला आहे.