
खतरों के खिलाडी 11 फेम सना मकबूल सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती नेहमीच तिचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते, हे फोटो चाहत्यांच्याही पसंतीस उतरतात.

सनाने आता लाल रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये तिचे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

या फोटोंमध्ये सना कमालीची सुंदर दिसत आहे. ती वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे. या फोटोत तिने आपला लूक अतिशय साधा ठेवला आहे.

सना स्टंट रिअॅलिटी शो खतरों के खिलाडी 11 मध्ये दिसली होती. जिथे ती जबरदस्त स्टंट करताना दिसली. तिला स्टंट करताना पाहून सर्वांनाच धक्का बसला. यासोबतच शोचा होस्ट रोहित शेट्टी अनेक वेळा तिची स्तुती करत होता.

सनाने अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केलं आहे. त्यात 'इस प्यार को क्या नाम दूं', 'कितनी मोहब्बत है' आणि 'विश' सारख्या अनेक मालिकांचा समावेश आहे.