
विवियान डिसेना (Vivian Dsena) एक लोकप्रिय टीव्ही अभिनेता आहे. विवियानने त्याच्या करिअरची सुरुवात 2008 मध्ये ‘कसम’ या शोद्वारे केली होती. यानंतर, तो ‘अग्निपरीक्षा जीवन की – गंगा’मध्ये दिसला होता.

मात्र, ‘प्यार की एक कहानी’ या शोमधून विवियानला लोकप्रियता मिळाली. यानंतर त्याची ‘मधुबाला: एक इश्क एक जुनून’ ही मालिका प्रचंड गाजली.

2013 मध्ये, विवियानने ‘प्यार की कहानी’ची स्टार कास्ट वाहबीज दोराबजी सोबत लग्नगाठ बधली होती. पण लग्नानंतर काही वर्षांनी दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला आणि दोघेही वेगळे झाले.

विवियन पुन्हा ‘शक्ती: अस्तित्व के एहसास की’ या शोमध्ये दिसला होता. विवियान आणि रुबीना दिलैक यांची केमिस्ट्री या शोमध्ये चांगलीच पसंत केली गेली होती.

मात्र, यानंतर तो ‘बिग बॉस शो’सह काही शोमध्ये पाहुना म्हणून दिसला. पण 2018 पासून, विवियान कोणत्याही टीव्ही शोमध्ये सक्रिय नाही. चाहते त्याला पुन्हा टीव्हीवर पाहण्याची वाट पाहत आहेत.