
बाॅलिवूड अभिनेता सलमान खान याची तगडी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते. सलमान खान याचे चाहते गेल्या कित्येक वर्षांपासून त्याच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत.

सलमान खान हा नुकताच IIFA पुरस्कार सोहळ्यात पोहचला होता. या पुरस्कार सोहळ्या दरम्यान एक मोठा प्रकार घडला असून एका हॉलिवूड सोशल मीडिया कन्टेंट क्रिएटरने थेट सलमान खान याला लग्नासाठी प्रपोज केला.

यावर सलमान खान थेट म्हणाला की, तुम्ही 20 वर्षांच्या अगोदर मला भेटायला हवे होते, आता माझे लग्नाचे वय होऊन गेले. आता सर्वांना प्रश्न पडलाय की, सलमान खान याला लग्नासाठी प्रपोज करणारी ही महिला नक्की कोण आहे?

सलमान खान याला लग्नासाठी प्रपोज करणारी ही महिला हॉलिवूड सोशल मीडिया कन्टेंट क्रिएटर आहे आणि ती सोशल मीडियावर चांगली सक्रिय असून जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही या महिलेची बघायला मिळते.

अलीना खलीफा तिचे नाव असून अलीना ही एक हॉलिवूड होस्ट असून AK चॅट्स शो ती चालवते. अलीना ही दिसायला अत्यंत सुंदर असून सोशल मीडियावर तिला 90.5 लोक फाॅलो करतात.