
'बिग बॉस मराठी' फेम 'कोकण हार्टेड गर्ल' अर्थात अंकिता प्रभू वालावलकर हिने आज दसऱ्याच्या शुभ मुहुर्तावर चाहत्यांसोबत एक आनंदाची बातमी शेअर केली आहे.

अंकिता प्रभू वालावलकरने तिच्या होणाऱ्या पतीसोबतचा फोटो शेअर केला आहे. सूर जुळले..., असं म्हणत अंकिताने तिच्या होणाऱ्या पतीसोबतचा फोटो शेअर केला आहे.

संगीत दिग्दर्शक कुणाल भगत याच्यासोबत रिलेशनशीपमध्ये आहे. लवकरत हे दोघे लग्न करणार आहेत. आज दसऱ्याच्या दिवशी अंकिताने कुणालसोबतचा फोटो शेअर केला आहे.

प्रेम हे एकमेकांसाठी जगणं आहे हे तू सांगितलंस... काळाच्या ओघात कळलच नाही. आयुष्य कसं कुठे बदललं, तू भेटलास आणि पुन्हा जगावसं वाटलं. वचन देते एका सुखी कौटुंबिक आयुष्याची तुझी सहचारिणी असेन, असं म्हणत अंकिताने कुणालसोबतचा फोटो शेअर केला आहे.

तुला खुश ठेवणं,तुला हसवणं,आता माझी सवय झाली आहे..आणि ही माझी सवय नेहमी आशीच ठेवेन... माझ्यावर विश्वास ठेव... माझ्या सोन्यासारख्या होणाऱ्या बायकोला दसऱ्याच्या शुभेच्छा, असं म्हणत कुणालनेही खास पोस्ट शेअर केली आहे.