
'बिग बॉस मराठी' चा यंदाचा सिझन चांगलाच गाजला. या रिअॅलिटी शोमधील स्पर्धकांचीही सर्वत्र चर्चा झाली. या स्पर्धकांमधील मैत्रीची सर्वत्र चर्चा झाली. या रिअॅलिटी शो संपल्यानंतरही हे नातं कायम आहे.

कोकण हार्टेड गर्ल अर्थात अंकिता प्रभू वालवलकर ही 'बिग बॉस मराठी' विजेता सूरज चव्हाणला भेटायला गेली. बारामतीतील मोढवे या सूरजच्या गावी जात तिने भेट घेतली.

अंकिता तिचा होणारा पती कुणाल भगतसोबत सूरजच्या गावी गेली होती. सूरजच्या कुटुंबियांसोबत अंकिताने वेळ घालवला. यावेळी बाजरीची भाकरी, बटाट्याची भाजी आणि मिर्चीचा ठेचा खाल्ला.

अंकिता आणि सूरजच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी कमेंट केलीय. गरीबाच्या घरी कधीच पाहुणे उपाशी मरत नाहीत. आमच्या बाजरीची भाकरी, ठेचा ज्वारी भाकरी, याला संपूर्ण जगात तोड नाही, असं एका नेटकऱ्याने म्हटलंय. कितीही मोठे झालात तरीही मातीला विसरू नका... ज्या मातीत आपण जन्म घेतलाय, अशीही कमेंट एका नेटकऱ्याने केलीय.

'बिग बॉस मराठी' मधील वैभव चव्हाणदेखील बारामतीचा आहे. त्याचीही अंकिताने भेट घेतली. यावेळी वैभवने तिला गणपतीची मूर्ती भेट दिली. अंकिता आणि आमचे दाजी यांचं बारामतीमध्ये मनापासून स्वागत..., असं म्हणत वैभवने हे फोटो शेअर केलेत.