
कपिल शर्मा हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या शोच्या माध्यमातून प्रेक्षकांचे जोरदार मनोरंजन करताना दिसत आहे. विशेष म्हणजे कपिल शर्मा याच्या याशोमध्ये अनेक स्टार हजेरी लावतात.

बाॅलिवूडचे अनेक स्टार आपल्या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी कपिल शर्मा याच्या या शोमध्ये पोहचतात. मात्र, गेल्या वर्षांपासून कृष्णा अभिषेक हा शोमध्ये दिसत नाहीये. चाहते कृष्णा अभिषेक याला मिस करत आहेत.

शेवटी आता लवकरच कृष्णा अभिषेक हा प्रेक्षकांच्या भेटीला कपिल शर्मा शोमध्ये येणार आहे. कृष्णा अभिषेक याने सांगितले की, जे काही पैशामुळे सुरू होते ते आता संपले आहे आणि मी लवकरच शोमध्ये पुनरागमन करणार आहे.

परत एकदा कपिल शर्मा शोसोबत जोडून कुटुंबामध्ये परतल्यासारखे वाटत आहे, असे कृष्णा अभिषेक म्हणाला. काही दिवसांपासून सतत चर्चा होत्या की, कपिल शर्मा आणि कृष्णा अभिषेक यांच्यामध्ये काहीतरी वाद सुरू आहे.

आता परत एकदा कृष्णा अभिषेक या प्रेक्षकांचे फुल मनोरंजन करताना दिसणार आहे. कृष्णा अभिषेक परत येत असल्याने चाहत्यांमध्येही उत्साहाचे वातावरण बघायला मिळत आहे.