प्रचंड सुंदर गाणं, प्रदर्शित होताच विकली 70 लाखांहून अधिक कॅसेट, आजही वेळ काढून लोक ऐकतात हे गाणं

कुमार सानू यांचं प्रचंड रोमँटिक गाणं, जे प्रदर्शित होताच या गाण्याचे 70 लाखांहून अधिक कॅसेटची झाली होती विक्री. माधुरी आणि संजय दत्तची जोडी ठरली होती प्रचंड सुपरहिट. आजही वेळ काढून चाहते हे गाणं ऐकतात.

| Updated on: Aug 16, 2026 | 2:19 PM
1 / 5
1991 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘साजन’ या सुपरहिट बॉलिवूड चित्रपटातील ‘मेरा दिल भी कितना पागल है’ हे रोमँटिक गाणं आजही संगीतप्रेमींच्या मनावर राज्य करतं. संजय दत्त आणि माधुरी दीक्षित यांच्यावर चित्रित करण्यात आलेल्या या गाण्याची लोकप्रियता आजही कायम आहे.

2 / 5
या गाण्याला नदीम-श्रवण यांनी संगीत दिलं असून गीतकार समीर यांनी त्याचे शब्द लिहिले आहेत. कुमार सानू आणि अलका याग्निक यांच्या सुरेल आवाजाने हे गाणं अधिकच लोकप्रिय झालं. प्रेम, भावना आणि विरहाचा सुंदर मिलाफ असलेलं हे गाणं त्या काळात तरुणाईमध्ये विशेष गाजलं होतं.

3 / 5
‘मेरा दिल भी कितना पागल है’साठी कुमार सानू यांना ‘बेस्ट मेल प्लेबॅक सिंगर’चा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. या पुरस्कारामुळे त्यांच्या कारकिर्दीतील हे गाणं आणखी महत्त्वाचं ठरलं.

4 / 5
‘साजन’च्या संगीताला प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला होता. चित्रपटाचा साउंडट्रॅक 1991 मधील सर्वाधिक विक्री झालेल्या बॉलिवूड ऑडिओ अल्बमपैकी एक ठरला. या अल्बमच्या तब्बल 70 लाखांहून अधिक प्रती विकल्या गेल्याचं सांगितलं जातं.

5 / 5
आजच्या डिजिटल युगात संगीत ऐकण्याची पद्धत बदलली असली तरी ‘मेरा दिल भी कितना पागल है’ या गाण्याची क्रेझ मात्र कमी झालेली नाही. कुमार सानू आणि अलका याग्निक यांच्या आवाजातील ही रोमँटिक जादू आजही जुन्या आठवणींना उजाळा देत प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us