
लॅक्मे फॅशन वीक 2021 ला सुरुवात झाली आहे. कोरोना महामारीनंतर इतक्या मोठ्या प्रमाणावर आयोजित होणारा हा पहिलाच कार्यक्रम आहे. गुरुवारी अनेक मॉडेल्सनी रॅम्प वॉक केला. त्याचवेळी श्वेता बच्चनने डिझायनर मोनिषा जयसिंग यांनी तिचे कलेक्शन लॉन्च केले.

श्वेता आणि मोनिशासह अनेक ट्रेंडीस्ट आउटफिट्सचे प्रतिनिधित्व केलं. जे लोकांच्या खूप पसंतीस उतरलं.

या सगळ्यात श्वेताने आपल्या साध्या लूकने सर्वांची मनं जिंकली. श्वेताने ऑफ-व्हाईट रंगाचा पोशाख घातला होता ज्यात ती कमालीची सुंदर दिसत होती.

मोनिशाने अलीकडेच श्वेतासोबतच्या तिच्या भागीदारीबद्दल सांगितलं की, मी आणि श्वेता अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखतो आणि मला तिची स्टाईल आवडते. तिचा फॅशन सेन्स खूप चांगला आहे आणि आमची टेस्ट सुद्धा सारखीच आहे. ज्यामुळे आम्ही ही भागीदारी मजेदार बनवली.

हा फॅशन वीक 10 ऑक्टोबर पर्यंत चालणार आहे. जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये लॅक्मे फॅशन वीक आयोजित केलं जात आहे. त्याची सुरुवात 7 ऑक्टोबरपासून झाली आहे.