
माधुरी कायम स्वतः फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. आता देखील अभिनेत्रीने काळ्या ड्रेसमधील काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

वयाच्या ५५ व्या वर्षी देखील माधुरी प्रचंड बोल्ड आणि ग्लॅमरस दिसते. सोशल मीडियावर फक्त आणि फक्त माधुरी हिच्या फोटोंची चर्चा रंगत आहे.

दिवसागणिक माधुरी हिचा बोल्डनेस वाढत आहे. सोशल मीडियावर माधूरी हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहते देखील माधुरीच्या प्रत्येक फोटोवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) कायम तिच्या घायाळ अदांमुळे चर्चेत असते. ९० व्या दशकात चाहत्यांच्या मनात राज्य करणारी अभिनेत्री आजही चाहत्यांमध्ये चर्चेत असते.

फक्त अभिनय नाही तर, कथक नृत्याच्या माध्यमातून देखील माधुरी चाहत्यांना घायाळ करते. आजही माधुरी हिला फॉलो करणाऱ्यांची संख्या कमी नाही.