
अभिनेता पृथ्वीक प्रताप याच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. पण अभिनेत्याचे पत्नीसोबत असलेले लग्नाआधीचे फोटो देखील व्हायरल होत आहेत.

कोणताच गाजावाजा न करता पृथ्वीक याने अत्यंत साधेपणात लग्न उरकलं आहे. अभिनेत्याच्या पत्नीचं नाव प्राजक्ता वायकूळ असं आहे. अभिनेत्याने लग्नाचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

पृथ्वीक याने कधीच स्वतःच्या खासगी आयुष्याचा खुलासा केला आहे. म्हणून अभिनेत्याच्या लग्नाचे फोटो पाहून चाहत्यांना धक्का बसला.

इतर सेलिब्रिटींप्रमाणे पृथ्वीक आणि प्राजक्ता यांनी थाटामाटात नाही तर, अगदी साधेपणात लग्न केलं आहे. पण फोटोंमुळे दोघांच्या चर्चा रंगल्या आहे.

पृथ्वीत आणि प्राजक्ता यांचे फोटो पाहिल्यानंतर दोघे गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत असल्याचं कळत आहे.