AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! महादेव मुंडे प्रकरणात अत्यंत मोठी अपडेट, उद्या दोन जणांचे…

परळी येथील व्यापारी महादेव मुंडे प्रकरणात अत्यंत मोठी अपडेट येत आहे. महादेव मुंडे प्रकरणात त्यांच्या कुटुंबियांकडून सातत्याने गंभीर आरोप केली जात आहेत. त्यामध्येच आता दोन जणांची नार्को टेस्ट करण्यात येणार आहे.

मोठी बातमी! महादेव मुंडे प्रकरणात अत्यंत मोठी अपडेट, उद्या दोन जणांचे...
Mahadev Munde
| Updated on: Feb 17, 2026 | 9:48 AM
Share

बीडमधील परळी येथील प्रसिद्ध व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणानंतर मोठी खळबळ उडाली. यादरम्यान त्यांच्या कुटुंबियांकडून गंभीर आरोप करण्यात आली. हेच नाही तर मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर महादेव मुंडे यांचे प्रकरणही गाजले. यामध्येही महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांनी थेट वाल्मिक कराडचे नाव घेतले. महादेव मुंडे यांच्या पत्नीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. एसआयटी चाैकशीची स्थापना करण्यात यावी आणि आम्हाला न्याय मिळावा याकरिता महादेव मुंडे यांच्या पत्नी आंदोलन करतानाही दिसल्या. अनेक पोलिस अधिकाऱ्यांवर त्यांनी गंभीर आरोपही केली. तपास अधिकारीही यादरम्यान बदलण्यात आली. आता महादेव मुंडे हत्या प्रकरणात अत्यंत मोठी अपडेट पुढे येताना दिसत आहे.

आज एका संशयताची ब्रेन मॅपिंग तर उद्या दोघांच्या नार्को टेस्ट होणार असल्याची माहिती पुढे येत आहे. आतापर्यंत 11 संशयित व्यक्तींच्या नार्को टेस्ट करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडुन मिळत आहे. यामुळे आता महादेव मुंडे हत्या प्रकरणात तपास यंत्रणांच्या हाती काही लागतं का? हे पाहणं महत्त्वाचं असेल. कारण गेल्या काही दिवसांपासून सतत तपास करूनही तपास यंत्रणांच्या हाती काहीच लागत नाही.

पोलिसांकडून या प्रकरणात सातत्याने चाैकशी केली जात आहे. मात्र, अजूनही ठोस अशी कारवाई काहीच झाली नसल्याचे बघायला मिळत आहे. महादेव मुंडे यांच्या पत्नीने थेट वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीचे नाव घेतले आहे. मात्र, म्हणावे तसे पुरावे असूनही मिळत नसल्याने नार्को टेस्ट घेतल्या जात आहेत. उद्या परत दोन जणांची महादेव मुंडे हत्या प्रकरणात नार्को टेस्ट केली जाईल.

महादेव मुंडे यांच्या हत्येनंतर राज्यातील अनेक मोठ्या नेत्यांनी महादेव मुंडे यांच्या घरी जात त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. महादेव मुंडे यांना न्याय मिळावा, याकरिता त्यांच्या कुटुंबियांकडून प्रयत्न केली जात आहेत. फक्त हेच नाही तर त्यांच्या पत्नीने काही दिवसांपूर्वीच पोलिस अधिक्षक कार्यालयाबाहेर स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला होता.

Follow Us
MPSC विद्यार्थ्यांसाठी राहुल गांधी मैदानात; पुण्यातील आंदोलनस्थळी...
MPSC विद्यार्थ्यांसाठी राहुल गांधी मैदानात; पुण्यातील आंदोलनस्थळी जाणार
पुणे बंदच पडले पाहिजे, अभिजीत दिपकेचं मोठं आवाहन; थेट म्हणाले, फोन करा
पुणे बंदच पडले पाहिजे, अभिजीत दिपकेचं मोठं आवाहन; थेट म्हणाले, फोन करा अन्...
महाविकास आघाडीत बिघाडी? ठाकरे गटाने मित्रपक्षाच्या विरुद्धच उमेदवार
महाविकास आघाडीत बिघाडी? ठाकरे गटाने मित्रपक्षाच्या विरुद्धच उभा केला उमेदवार, सामना'तून दिली माहिती
अजब! चक्क पोलिसांच्या गाडीत बसून आरोपीने बनवली रील, व्हिडिओ तुफान...
अजब! चक्क पोलिसांच्या गाडीत बसून आरोपीने बनवली रील, व्हिडिओ तुफान व्हायरल
निवडणुका 2024 मध्ये झाल्या अन् ज्ञानेश कुमार 2025 मध्ये पदावर आले...
निवडणुका 2024 मध्ये झाल्या आणि ज्ञानेश कुमार 2025 मध्ये पदावर आले, मग... CM फडणवीसांनी समीकरणच मांडलं
खासदार ओमराजे निंबाळकर आले अन् विद्यार्थ्यांनी थेट... पुण्यातील आंदोलन
खासदार ओमराजे निंबाळकर आले अन् विद्यार्थ्यांनी थेट... पुण्यातील आंदोलनादरम्यान नेमकं काय घडलं?
संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल, तरुणांच्या आंदोलनावर म्हणाले...
संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल, तरुणांच्या आंदोलनावर म्हणाले जंतर-मंतरचा पॅटर्न
नितेश राणेंकडून शरद पवार गटातील नेत्याचं कौतुक; म्हणाले, 'मी त्यांना..
नितेश राणेंकडून शरद पवार गटातील नेत्याचं कौतुक; म्हणाले, 'मी त्यांना शत्रू मानत नाही, ते माझे...
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा