EPFO Rule Change : आता एका क्लिकवर काढा 90 टक्के रक्कम; EPFOच्या नियमात प्रचंड मोठे बदल
ईपीएफओने नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत, ज्यामुळे पीएफ खातेदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता नोकरी सोडल्यावर किंवा 55 वर्षांपूर्वी निवृत्त झाल्यास 90% पीएफ रक्कम एका क्लिकवर काढता येणार आहे. यासोबतच सिस्टिमॅटिक विड्रॉल प्लॅन (SWP) मंजूर झाल्याने निवृत्तांना हप्त्यांमध्ये पीएफ काढता येईल. बेरोजगारीसाठी काढण्याचा प्रतीक्षा कालावधीही 12 महिन्यांवरून 2 महिन्यांवर आणला आहे, ज्यामुळे पीएफ काढणे अत्यंत सोपे झाले आहे.

कर्मचारी भविष्य निधी म्हणजे ईपीएफओने आपल्या नियमात प्रचंड मोठे बदल (EPFO Rule Change) केले आहेत. केंद्र सरकारच्या या निर्णयाने नोकरदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. ईपीएफओने आता आंशिक रक्कम काढण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी केली आहे. आता नव्या बदलानुसार, जे 55 वर्षाच्या आत निवृत्त होत आहेत वा नोकरी सोडत आहेत, असे पीएफ खातेधारक आपल्या पीएफ बॅलन्सचा 90 टक्के पैसा लगेच काढू शकतात. आता एका क्लिकवर ही रक्कम काढता येणार आहे.
याशिवाय सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज (CBT)ने सिस्टमॅटिक विड्रॉल प्लान (SWP) सुरू करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे निवृत्त होणाऱ्या ईपीएफ सदस्यांना आपला जमा भविष्य निधी म्हणजे पीएफची रक्कम एकावेळी पूर्ण काढण्याऐवजी टप्प्या टप्प्याने हप्त्यांच्या स्वरुपात काढता येणार आहे. म्हणजे पीएफ फंडाला एक नियमित आणि निश्चित इन्कम स्त्रोतात बदलता येणार आहे. एएनआयच्या रिपोर्टच्या सूत्रांनुसार, जर पेमेंटच्या अवधीच्या काळात सदस्याचा मृत्यू झाला तर, त्याचा नॉमिनी उरलेली रक्कम काढू शकतो. वा एसडब्ल्यूपीच्या अंतर्गत वेळोवेळी मिळणारा पेमेंट सुरू ठेवू शकतो.
75% नव्हे, आता 90% काढा
ईपीएफ मेंबर्सला आता आपली रिटायरमेंट सेव्हिंग्सचा वापर करणे अत्यंत सोपं होणार आहे. मनी कंट्रोलच्या रिपोर्टनुसार, संघटनेने पीएफ अकाऊंटमध्ये मिनिमम बॅलन्स 25 टक्क्यांवरून घटवून 10 टक्के केलं आहे. म्हणजे आता खात्यात 10 टक्के बॅलन्स असले तरी पुरेसे आहे. सोप्या शब्दात सांगायचं म्हणजे पूर्वी खातेदार पीएफ खात्यातून 75 टक्के रक्कम काढू शकायचे. कारण 25 टक्के रक्कम खात्यात बॅलन्स असणं आवश्यक होतं. पण आता काही अटींनुसार 90 टक्के रक्कम खात्यातून तात्काळ काढता येणार आहे.
आता वाट पाहावी लागणार नाही
ईपीएफओने अजून एक मोठा निर्णय घेतला आहे. आता ईपीएफओ मेंबर्सला बेरोजगारीशी संबंधित पीएफ विड्रॉलसाठी अधिक वाट पाहण्याची गरज पडणार नाही. म्हणजे व्होटिंग पीरियड कमी करण्यात आला आहे. ईपीएफ स्किम 2026 मध्ये बदललेल्या नियमानुसार क्वालिफाइंग पीरियड 12 महिन्याने कमी करून दोन महिने करण्यात आला आहे.
कोणत्या कामासाठी पैसे काढता येणार?
अनेक आर्थिक कारणांसाठी पार्शियल विड्रॉल करता येणार आहे.
मेडिकल : स्वत:च्या किंवा कुटुंबातील व्यक्तींच्या वैद्यकीय उपचारांसाठी अटी आणि शर्तींवर पैसे काढता येणार आहे.
शिक्षण : शैक्षणिक कारणासाठी पैसे काढता येणार आहे.
विवाह : स्वत:च्या किंवा कुटुंबातील व्यक्तीच्या लग्नासाठी पैसे काढता येणार आहे.
घर : घर किंवा जमीन खरेदी करण्यासाठी, होम लोन फेडण्यासाठी, घराची रंगरंगोटी किंवा दुरुस्ती करण्यासाठी पैसे काढता येणार आहे.
याशिवाय इतर कारणांनीही पैसे काढता येणार आहे. मात्र, नियमानुसारच ही रक्कम काढता येणार आहे. पैसे काढण्यासाठी उपलब्ध अमाऊंट ही कॅटेगिरी, गरज आणि आवश्यक फ्रिक्वेन्सी लिमिटच्या हिशोबाने वेगवेगळी असू शकते.
