
सुपरस्टार सलमान खानच्या 'अंतिम' चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटातील सलमान आणि आयुषच्या लूकची बरीच चर्चा आहे. या चित्रपटात आयुषसोबत अभिनेत्री महिमा मकवाना आहे. महिमा मकवाना हा टीव्हीचा प्रसिद्ध चेहरा आहे.

चित्रपटातील महिमाच्या पात्राचे नाव मंडी आहे जी आयुष शर्माच्या मैत्रिणीची भूमिका साकारत आहे. ट्रेलरमध्ये दोघांची केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. जाणून घेऊया कोण आहे महिमा मकवाना..

महिमाचा जन्म 5 ऑगस्ट 1999 रोजी मुंबईत झाला. तिचे वडिल बांधकाम कामगार होते महिमा 5 वर्षांची असताना त्यांचं निधन झालं. आईने तिचा सांभाळ केला. अभिनेत्रीने पत्रकारितेत पदवी घेतली आहे. तिला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. त्यामुळे वयाच्या 10 व्या वर्षापासून ऑडिशन द्यायला सुरुवात केली. तिचा पहिला टीव्ही शो 'मोहे रंग दो' होता.

2012 मध्ये 'सपने सुहाने लडकपन'मध्ये ती पहिल्यांदा लीड रोलमध्ये दिसली होती. याशिवाय 'दिल की बातें दिल ही जाने', 'कहानी अधुरी हमारी' या शोमध्ये ती दिसली. 'मरियम खान रिपोर्टिंग लाइव्ह'मध्ये अभिनेत्रीच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट आला. तिच्या अभिनयाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

2017 मध्ये महिमाने 'वेकंटपुरम'मधून तेलुगूमध्ये पदार्पण केले. याशिवाय 'रंगबाज सीझन 2' आणि 'फ्लॅश' वेब सीरिजमध्ये ती दिसली होती. अभिनेत्री सोशल मीडियावर खूप सक्रिय असते, ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. अभिनेत्री स्वत:ला फिट ठेवण्यासाठी योगा आणि वर्कआउट करते.