
अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. पण आता अभिनेत्री तिच्या ट्रान्सफरंट लूकमध्ये केलेल्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.

आता पोस्टे केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्री काळ्या रंगाच्या ब्लेझर सूटमध्ये दिसत आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे. नव्या फोटोशूटमध्ये अभिनेत्रीच्या रॉयल लूकवर चाहत्यांच्या नजरा येवून थांबल्या आहेत.

मलायका हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

मलायका अरोरा हिचा हा लूक तिच्या चाहत्यांना आवडला असून या फोटोवर लोक मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. फोटोंमध्ये मलायका हॉट आणि बोल्ड दिसत आहे.