
अभिनेत्री प्राजक्ता माळी तिच्या अभिनयामुळे चाहत्यांना आवडते. तिचे सिनेमे-मालिका यांना सिनेरसिकांची पसंती मिळते.

अभिनयासोबतच प्राजक्ता वेगवेगळे प्रयोग करत असते. काही दिवसांआधी तिचं कवितांचं पुस्तक प्रकाशित झालं. नंतर तिने मराठमोळ्या दागिन्यांचा ब्रँड काढला अन् आता तिने फार्म हाऊस खरेदी केलं आहे.

कर्जतमध्ये तिने 'प्राजक्तकुंज' फार्महाऊस घेतलं आहे. हा फोटो शेअर करताना खानदानातली सर्वात सुंदर प्रॉपर्टी, खानदानातल्या सर्वात मोठ्या कर्जासहीत खरेदी केली म्हटलं.

हे फार्म हाऊस घेण्याचं बजेट नव्हतं. पण मी या फार्म हाऊसच्या प्रेमात पडले. भलं मोठं कर्ज काढलं. घरातल्या लोकांचे दागिने गहाण ठेवले अन् हे फार्म हाऊस घेतलं. पण खात्री आहे की हे कर्ज मी फेडेन, असं प्राजक्ताने एका मुलाखती दरम्यान म्हटलं.

याच फार्महाऊसमध्ये निवांत क्षण घालवताना प्राजक्ता... याचसाठी केला होता अट्टहास, म्हणत प्राजक्ताने हे फोटो शेअर केलेत.

काही दिवसांआधी या फार्महाऊसची पूजा झाली.घरच्या मंडळींसोबतचे फोटो शेअर करत प्राजक्ताने ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली.