
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!, म्हणत अभिनेत्री सई ताम्हणकर हिने हे खास फोटो शेअर केलेत. तिळगुळ पण लाजतील असा तुझा हा साज आहे, खऱ्या अर्थाने माझी संक्रात आज आहे, अशी कमेंट सईच्या फोटोवर चाहत्याने केली आहे.

आठवण सूर्याची, साठवण स्नेहाची, कणभर तीळ, मनभर प्रेम, गुळाचा गोडवा, स्नेह वाढवा. तिळगुळ घ्या.. गोड गोड बोला, म्हणत सोनाली कुलकर्णीने संक्रातीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मकर संक्रांतीच्या सगळ्यांना खूप शुभेच्छा! तीळ-गूळ घ्या आणि गोड गोड बोला, असं म्हणत अभिनेत्री मिथिला पालकर हिने साडीतील खास फोटो शेअर केलेत. माझ्या हृदयाचा पतंग, म्हणत चाहत्याने मिथिलाच्या फोटोवर कमेंट केलीय.

मकरसंक्रांतीच्या तुम्हा सर्वांना ‘Retro’ शुभेच्छा! तीळ गुळ घ्या… आणि खुप गोड गोड बोला…, म्हणत ठिपक्यांची रांगोळी या मालिकेतील अभिनेत्री ज्ञानदा रामतिर्थकर हिने हे खास फोटो शेअर केलेत.

अभिनेत्री भाग्यश्री लिमये हिनेही ब्लॅक कलरच्या ड्रेसमधील फोटो शेअर केलेत. गोड गोड बोला, म्हणत तिने हे खास फोटो शेअर केलेत. तिच्या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळतेय.