
अभिनेत्री मिताली मयेकर तिच्या बोल्ड आणि सुंदर अंदाजासाठी ओळखली जाते. नेहमीच नवनवीन फोटो शेअर करत मिताली चाहत्यांची मनं जिंकते.

नुकतंच मितालीनं आपल्या खास मित्रांसोबत म्हणजेच जुईली जोगळेकर आणि नचिकेत लेलेसोबत हिमाचल प्रदेशची सफर केली आहे.

या ट्रीपचे अनेक फोटो तिनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो आता सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

एवढंच नाही तर मितालीच्या खास टॅटूनं चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. डोंगर आणि नदीचा टॅटू तिनं आपल्या पायावर काढला आहे.

मितालीनं ‘असंभव’, ‘अनुबंध’, ‘भाग्यलक्ष्मी’, ‘उंच माझा झोका ग’, ‘तु माझा सांगाती’, ‘फ्रेशर्स’, ‘महाराष्ट्राचा फेवरेट डान्सर’ या मालिकांमधून मितालीनं चाहत्यांची मनं जिंकली.

काही महिन्यांपूर्वी मिताली मयेकर आणि अभिनेता सिद्धार्थ चांदेकर लग्नबंधनात अडकले आहेत.