सगळं बॉलिवूड रेंडवर आहे!, आम्ही जे छान-छान कपडे घालतो ते विकत घेतो असं तुम्हाला वाटतं का? तर याचं उत्तर नाही असं आहे. आम्ही ते रेंटवर घेतो, असं आयुष्मान म्हणाला.

सगळं बॉलिवूड रेंडवर आहे!, आम्ही जे छान-छान कपडे घालतो ते विकत घेतो असं तुम्हाला वाटतं का? तर याचं उत्तर नाही असं आहे. आम्ही ते रेंटवर घेतो, असं आयुष्मान म्हणाला.

आम्ही स्टायलिश हायर करतो. ते त्यांच्या कॉन्टॅक्टने आम्हाला चांगले कपडे उपलब्ध करून देतात. कपडे वापरून झाले की आम्ही ते त्यांना परत देतो, असं आयुष्मानने सांगितलं.

वारंवार होणाऱ्या कार्यक्रमांना आम्ही स्टायलिश कपडे घालतो. ते एवढे सगळे कपडे आता आम्ही कुठे घेऊन जाणार? त्यामुळे स्टायलिशकडून आम्ही कपडे घेतो. वापरून त्यांना परत करतो, असं आयुष्मान म्हणाला.

आधी माझा भाऊ अपारशक्ति खुराना माझ्यासाठी स्टायलिश म्हणून काम करायचा. तेव्हा मी त्याला पॉकेटमनी द्यायचो. तेव्हा आमचे पैसे घरातच राहायचे. पण आता तो चांगला अभिनेता झाला आहे. त्यामुळे त्याच्याकडे तेवढा वेळ नाही, असं आयुष्मान म्हणाला.