
हेमांगी कवी... हेमांगी ही मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री... हेमांगीच्या अभिनयाला प्रेक्षक दाद देतात. मराठी मालिका, सिनेमांसोबतच हिंदी टीव्ही मालिकांमध्येही हेमांगीने काम केलं आहे. तिने काही कॉमेडी रिअॅलिटीशोमध्ये देखील काम केलं आहे.

आता हेमांगी हिंदी टीव्ही शोमध्ये दिसते आहे. मॅडनेस मचायेंगे या हिंदी रिॲलिटी शोमध्ये हेमांगी सध्या दिसतेय. तिच्या अभिनयाच्या जोरावर संपूर्ण भारताला हेमंगी हसवते आहे.

मॅडनेस मचायेंगे हिंदी रिॲलिटी शो आहे. यात कॉमेडी स्किट सादर केले जातात. 9 मार्चपासून हा कार्यक्रम सोनी टीव्हीवर प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात हेमांगीसोबत अभिनेता कुशल बद्रिकेसुद्धा सहभागी झाला आहे.

मराठीसोबतच हेमांगीने हिंदी मालिकांमध्येही काम केलं आहे. कैसै मुझे तुम मिल गए या झी टीव्हीवरच्या मालिकेतही हेमांगी दिसली होती. भवानी चिटणीस हे पात्र साकारलं होतं. तिच्या कामाला लोकांची पसंती मिळाली.

हेमांगीने अनेक दर्जेदार सिनेमांमध्ये काम केलं आहे. धुडगूस, मनातल्या मनात, भारत माझा देश आहे, पिपाणी, कमाशा लाईव्ह, पांडू, बंदीशाळा या सिनेमांमधील तिच्या भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या.