
मुंबई | 19 मार्च 2024 : अभिनेत्री प्राजक्ता माळी... तिचा अभिनय चाहत्यांना आवडतो. 'जुळून येती रेशीमगाठी' या मालिकेतील मेघना या पात्राने प्राजक्ताला महाराष्ट्राच्या घराघरात ओळख दिली.

या लोकप्रिय मालिकेनंतर प्राजक्ताच्या फॉलोव्हर्समध्ये वाढ झाली. प्राजक्ताने इतरही अनेक प्रोजेक्ट केले. कामासोबतच प्राजक्ता तिच्या बिंधास्त स्वभावासाठी ओळखली जाते. विविध मुद्द्यांवर प्राजक्ता तिची मतं मांडत असते.

प्राजक्ता एका मुलाखती दरम्यान तिच्या खासगी आयुष्यातील घटनेवर बोलती झाली. प्राजक्ताने ब्रेकअपवर भाष्य केलं आहे. 'वाय' सिनेमाच्या शुटिंग दरम्यान ब्रेकअप झाल्याचं प्राजक्ताने सांगितलं.

'वाय' सिनेमाच्या शुटिंग दरम्यान माझं ब्रेकअप होत होतं. त्यामुळे माझ्यासोबत काय सुरु आहे काही मला समजत नव्हतं. आता मला सांगतात की तो सिन करताना तू पडली होती. पण मला ते आठवत नाही. तेव्हा मी माझ्याच झोनमध्ये होते, असं प्राजक्ता म्हणाली.

'जुळून येती रेशीमगाठी' या मालिकेने प्राजक्ताला ओळख दिली. मात्र हंपी, तीन अडकून सीताराम, लकडाऊन, चंद्रमुखी या सिनेमांमधील तिच्या भूमिकाही गाजल्या. हास्य जत्रा या कार्यक्रमातील तिचं सूत्रसंचालनही प्रेक्षकांना आवडतं.