
सध्या सेलिब्रिटी सोशल मीडियावर चर्चेत असतात. अभिनेत्री रसिका सुनील ही देखील सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. ती वेगवेगळ्या पोस्ट सोशल मीडियावर शेअर करते.

आता नुकतं रसिकाने एक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. रसिकाने साडीतील खास फोटो शेअर केलेत. या फोटोंसोबतच रसिकाने या पोस्टला दिलेल्या कॅप्शनचीही जोरदार चर्चा होत आहे.

ब्लॅक, व्हाईट आणि ब्राऊन कलरच्या साडीतील हे खास फोटो रसिकाने सोशल मीडियावर शेअर केलेत. खूप खूप खूप आनंदी... लवकरच या साडीवरचं रील पोस्ट करत आहे, असं कॅप्शन रसिकाने या फोटोला दिलं आहे.

रसिकाच्या साडीतील फोटोंना नेटकऱ्यांची पसंती मिळतेय. तिचा पती आदित्य बिळगीने 'माझी सुंदरी' म्हणत कमेंट केलीय. तर किती सुंदर दिसतीयेस, अशी कमेंट रसिकाच्या चाहत्याने केली आहे.

रसिका मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत शनाया हे पात्र रसिकाने साकारलं. या भूमिकेने रसिका प्रसिद्धी झोतात आणलं. त्यानंतर गर्लफ्रेंड, बसस्टॉप, शॉर्ट अॅण्ड स्वीट या सिनेमांमध्येही रसिकाने काम केलं आहे.