
अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अभिनेता अजिंक्य ननावरे यांनी लग्नगाठ बांधली. 1 फेब्रुवारीला या दोघांचा विवाह पार पडला.

शिवानी आणि अजिंक्य यांच्या लग्नातील खास फोटो समोर आले आहेत. शिवानी आणि अजिंक्य या दोघांचे लग्नातील खास क्षण...

लग्नावेळी या दोघांनी खास मराठमोळा लूक केला होता. शिवानीने साडी नेसली होती. तर अजिंक्यनेही पारंपरिक वेश केला होता.

शिवानी आणि अजिंक्य हे एकमेकांच्या प्रेमात होते. मग बराच काळ एकमेकांसोबत घालवल्यानंतर या दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला.

31 जानेवारीला या दोघांचा साखरपुडा झाला. Aww- Fishily Engaged म्हणत दोघांनी हे फोटो शेअर केले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दोघांनी लग्न केलं.