
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत... तिच्या अभिनयामुळे आणि तिच्या बिंधास बोलण्यासाठी प्रसिद्ध आहे. तिच्या लुक्सचीही चर्चा होते.

सध्या कंगनाने नुकतंच गुलाबी रंगाच्या साडीतील फोटो शेअर केलेत.तिच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळताना दिसत आहेत. तर काही नेटकऱ्यांनी मात्र भन्नाट कमेंट्स केल्या आहेत.

जेव्हा कोहिनूर हिरा मोती परिधान करतो... अशी कमेंट एका नेटकऱ्याने केलीय. तर कुणी साडी नेसायला शिकावी तर कंगना रनौतकडून, अशी कमेंट दुसऱ्याने केलीय.

का तू इतकी सुंदर आहेस...? पेस्टल कलर तुझ्यावर सुट होतोय. तू नेहमी प्रमाणे क्विन दिसतीयेस, असं दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटलंय.

निळ्या रंगाच्या साडीतील कंगनाचा हा खास लुक... साधनाजींच्या अप्रतिम सौंदर्याने प्रेरित हा लूक... तुम्हाला आवडला का?, असं म्हणत कंगनाने हे खास फोटो शेअर केलेले. यालाही नेटकऱ्यांनी पसंती दिली होती.