
'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेतील बालकलाकार मायरा वायकुळ हिची सोशल मीडियावर चर्चेत असते. तिच्या रील्स आणि फोटोंना नेटकरी पसंती देतात. मात्र सध्या ती प्रचंड ट्रोल झाली आहे. 'नाच गं घुमा'हा मायराचा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय या सिनेमाच्या प्रमोशननिमित्त मायराने मुलाखती दिल्या. या मुलाखतीतील तिच्या उत्तरांवरून आणि बोलण्याच्या शैलीवरून मायरा प्रचंड ट्रोल झाली आहे.

ही खरंच लहानच आहे ना... शाळेतली आणि बालपणाची मज्जा लुटायच्या वयात हे काय करतेय ही... just see her accent and expressions.. कोण म्हणेल ही लहान आहे. पैसे आणि प्रसिद्धीच्या बदल्यात निरागसपणा हरवला.. हे बालपण पुन्हा मिळणं नाही.. , अशी कमेंट एकाने केली आहे.

मायरा तिच्या फ्युचर प्लॅन्सबद्दल एका मुलाखतीत सांगताना दिसते. तिच्या या उत्तरावरून मायराला अनेकांनी ट्रोल केलं आहे. आता ही आधीसारखी वाटत नाही. हिच्यात खूप अॅटिट्यूड आलाय. हिचं बालपण कुठेतरी हरवल्यासारखं वाटतं. तीच्या आई-बाबांना असं वाटतं नाही?, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे.

पैशासाठी आई वडील लेकराचा निरागसपणा विकतात. ती एखाद्या सोळा सतरा वर्षाच्या मुलीसारखी बोलायला लागली आहे. काय ते वागणं, काय ते बोलणं.. थोडी प्रसिद्धी मिळाली आणि गर्व आला हिला.. गर्वच घर नेहमी खाली पडत हे शिकवलं नाही का हिच्या आई वडिलांनी? ही मला आधी छान वाटायची पण रील्सवर वयाला न शोभणारे हावभाव बघून नको वाटतं, अशी कमेंट दुसऱ्या नेटकऱ्याने केली आहे.

कोण म्हणेल ही लहान आहे? असं वाटतं एखादी मोठी हिरॉइन इंटरव्यू देतेय... लहान पण कसं निरागस असतं, खेळत वातावरण असतं. थोडं खट्याळ थोडं वेडं वाकडं बोलणं. थोडसंमध्ये काहीतरी असं बोलणं जेने सगळेजण हसून जातील. तसं काही हिच्या बोलण्यात नाहीये. खूपच लवकर ही मोठी झाली, असं आणखी एकाने म्हटलं आहे.