
हिरामंडी... सध्ये प्रचंड चर्चेत असणारी वेबसिरीज... प्रसिद्ध संजय लीला भन्साळी यांची पहिली वहिली वेबसिरीज असल्याने ही वेबसिरीज मोठ्या प्रमाणावर पाहिली जात आहे.

हिरामंडी वेबसिरीजमध्ये अनेक कलाकार दिसतात. यातील अभिनेत्रींनी तर मन जिंकलच आहे. पण एका अभिनेत्यानेही प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. त्याच्या कामाचं प्रचंड कौतुक होत आहे.

अभिनेता ताहा शाह बदुशा... ताहाने हिरामंडी या वेबसिरीजमध्ये काम केलं आहे. ताजदार हे पात्र ताहाने साकारलं आहे. ताजदार आणि त्याची प्रेयसी आलमजेब या दोघांची केमेस्टी प्रेक्षकांना आवडते आहे.

ताजदार आणि आलमजेब या दोघांची केमेस्ट्री दाखवणारे व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या दोघांचे डायलॉग सध्या हिट ठरत आहेत.

ताहा मूळचा अबुधाबीचा आहे. 'लव्ह का द एंड' या सिनेमात त्याने श्रद्धा कपूरसोबत काम केलंय. तर कतरिना कैफसोबत 'बार बार देखो' या सिनेमात तो दिसला होता. मात्र हिरामंडीमधील त्याच्या कामाची जोरदार चर्चा होतेय. तो सध्या नवा 'नॅशनल क्रश' झाल्याचं पाहायला मिळतंय.