
अनाथांची माय... अर्थातच सिंधुताई सपकाळ... सिंधुताई यांचं जीवन म्हणजे अडथळ्यांनी भरलेली वाहती सरिता... त्यांचं आयुष्य सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे.

सिंधुताई सपकाळ यांनी आपलं अवघं आयुष्य अनथांच्या कल्याणासाठी वेचलं. ज्या लहान मुलांचं कुणी नाही. त्या अनाथांच्या त्या माय झाल्या.

सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावर एक मालिका येत आहे. आजपासून ही मालिका कलर्स मराठीवर दररोज संध्याकाळी 7 वाजता पाहता येणार आहे.

बालकलाकार अनन्या टेकवडे ही सिंधुताईंच्या बालपणाचं पात्र साकारत आहे. शिवानी सोनार ही सिंधुताई यांची भूमिका करत आहे.

चिंधी ते डॉ. सिंधुताई सपकाळ... असा माईंचा प्रवास या मालिकेतून महाराष्ट्राच्या भेटीला येणार आहे. या मालिकेतून सिंधुताई सपकाळ यांचा जीवनप्रवास उलगडणार आहे.