
तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका गेल्या पंधरा वर्षांपासून चाहत्यांचे जबरदस्त असे मनोरंजन करताना दिसत आहे. या मालिकेतील कलाकारांची देखील सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते.

तारक मेहता का उल्टा चश्मामध्ये अनेकांना बबिता जी आणि जेठालालची जोडी आवडते. मालिकेमध्ये जेठालाल याला बबिता आवडते असे दाखवण्यात आले आहे. बबिता ही अय्यर याची पत्नी आहे.

नुकताच बबिता जी अर्थात रिअल लाईफमधील मुनमुन दत्ता हिने एका रेस्टोरेंटमधील तिचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय. या फोटोमध्ये मुनमुन दत्ता हिचा जबरदस्त असा लूक दिसतोय.

मुनमुन दत्ता हिचा हा फोटो पाहून अनेकांना थेट जेठालाल याची आठवण आलीये. अनेकांनी या फोटोवर कमेंट करत थेट बबिता जी...जेठालाल तुम्हाला मिस करत असल्याचे म्हटले आहे.

गेल्या काही दिवसांपासून तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेला अनेक कलाकार हे कायमचा रामराम करून जाताना दिसत आहेत. इतकेच नाही तर शैलेश लोढाने काही गंभीर आरोप केले आहेत.