
'बिग बॉस मराठी'च्या घरातील सदस्यांना खास सरप्राईज मिळणार आहे. बिग बॉस मराठी'च्या घरात आज 'नवरा माझा नवसाचा 2' सिनेमाची टीम येणार आहे. आवडत्या कलाकारांसह बिग बॉस मराठी'च्या घरात सदस्य मजेदार टास्क खेळणार आहेत.

'बिग बॉस मराठी'सह सध्या नुकताच प्रदर्शित झालेला 'नवरा माझा नवसाचा 2' हा सिनेमा चर्चेत आहे. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी कलाकार मंडळी आज बिग बॉस मराठीच्या घरात येणार आहेत.

'बिग बॉस मराठी'चा नवा प्रोमो समोर आला आहे. यात 'नवरा माझा नवसाचा 2' या सिनेमातील कलाकार 'बिग बॉस मराठी'च्या घरात आले आहेत. स्वप्नील जोशी, सुप्रिया पिळगांवकर आणि अशोक सराफ बिग बॉसच्या घरात एन्ट्री केली आहे.

'नवरा माझा नवसाचा 2' चे कलाकार 'डम डम डमरू वाजे' या गाण्यासह इतर गाण्यांवर धमाल डान्स करताना दिसत आहेत. तसंच बिग बॉसच्या सदस्यांना पदार्थ ओळखण्याचा मजेदार टास्क दिल्याचं दिसत आहे.

तब्बल 19 वर्षांनंतर 'नवरा माझा नवसाचा 2' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. बॉक्स ऑफिसवरही हा सिनेमा चांगलाच गल्ला जमवतोय. अशातच 'नवरा माझा नवसाचा 2' चित्रपटाची टीम 'बिग बॉस मराठी'च्या घरात दिसणार आहे.