
अभिनेत्री नोरा फतेही ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. सुकेश चंद्रशेखर प्रकरणात नोराचे नाव आल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. या प्रकरणात नोरावर काही गंभीर आरोपही करण्यात आले.

नोरा फतेही हिला सुकेश चंद्रशेखर अत्यंत महागडे गिफ्ट दिल्याचे सांगितले जातंय. मात्र, नोरा फतेही हिने सर्व आरोप खोटे असल्याचे सांग, मला या प्रकरणात फसवले जात असल्याचे म्हटले होते.

सध्या सोशल मीडियावर नोरा फतेही हिचा एक डान्स व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये नोरा फतेही अक्षय कुमार याच्यासोबत डान्स करताना दिसत आहे.

लाल रंगाच्या कपड्यांवर नोराचा जबरदस्त असा लूक दिसतोय. नोरा फतेही हिचा हा बेली डान्स तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. हा व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहे.

नोरा फतेही अक्षय कुमार याच्या गाण्यावर बेली डान्स करताना दिसत आहे. युजर्सने या डान्सच्या व्हिडीओवर कमेंट करत नोरा फतेही हिचे काैतुक केले आहे. या व्हिडीओला चाहत्यांचे प्रचंड प्रेम मिळत आहे.