
गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूड अभिनेत्री नोरा फतेही ही प्रचंड चर्चेत आहे. नोरा फतेही हिचे नाव सुकेश चंद्रशेखर प्रकरणात आल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला होता

नोरा फतेही हिला सुकेश चंद्रशेअर याने अत्यंत महागडे गिफ्ट दिल्याचे सांगितले जाते. इतकेच नाहीतर सुकेश चंद्रशेखर प्रकरणात नोरा फतेही हिची आतापर्यंत बऱ्याचदा चाैकशी देखील करण्यात आलीये.

नोरा फतेही सध्या अमेरिकेत आहे. नोरा फतेहीने काही दिवसांपूर्वीच अक्षय कुमार याच्यासोबत जबरदस्त असा डान्स केला. ज्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले.

नुकताच नोरा फतेही हिने सोशल मीडियावर तिचे नवे फोटोशूट शेअर केले आहे. या फोटोमध्ये नोरा फतेही हिचा लूक जबरदस्त दिसत आहे. नोरा फतेही हिच्या या फोटोमुळे आता इंटरनेटचा पारा चांगलाच वाढला आहे.

फोटोशूटमध्ये नोरा फतेही हिने काळ्या रंगाचा ब्रॅलेट घातला आहे. यासोबतच तिने निळ्या रंगाची डेनिम शॉर्ट्स घातली आहे. आता या फोटोवर एका चाहत्याने लिहिले की, AC वाढवा, नोराच्या फोटोमुळे तापमान वाढले आहे.