
बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहेत. नोरा सध्या मॉरिशसमध्ये सुट्टी घालवत आहे.

नोरा आपल्या चाहत्यांसाठी मॉरिशसमधील काही व्हिडीओ आणि फोटो शेअर करत आहेत. जे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये नोरा ब्लॅक स्विम टॉप आणि ब्लू डेनिम शॉर्टमध्ये दिसत आहे. या फोटोमध्ये नोराचा बोल्ड लूक दिसतोय.

नोराच्या फोटोमध्ये एक मुलगा देखील दिसतोय. हा व्यक्ती नेमका कोण याची चर्चा आता सोशल मीडियावर रंगताना दिसत आहे.

नोरासोबत दिसत असलेल्या व्यक्तीचे नाव मार्स पेड्रोझो असल्याचे कळते आहे. मार्स पेड्रोझो हा नोराचा हेअरस्टायलिस्ट असल्याचे सांगितले जातंय.