
भारतात परतल्यानंतर अभिनेत्रीला विमानतळावर स्पॉट करण्यात आलं. सध्या अभिनेत्रीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. युद्धातून बचावल्यानंतर भारतात आलेल्या अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर भीती दिसत होती.

विमानतळावर स्पॉट केल्यानंतर अभिनेत्री ‘सध्या प्रचंड हैराण आहे, कृपया मला घरी पोहोचू द्या..’ फक्त एवढंच म्हणाली. आता अभिनेत्री इस्त्रायलमध्ये होत असलेलं युद्ध आणि आलेल्या अनुभवाबद्दल काय सांगते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.. सध्या सर्वत्र नुसरत हिची चर्चा रंगली आहे.

हैफा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी अभिनेत्री तिथे गेली होती. या फिल्म फेस्टिवलमध्ये अभिनेत्रीचा ‘अकेली’ सिनेमा दाखवण्यात आला. जेव्हा हल्ला झाला तेव्हा शुक्रवारी दुपारी अभिनेत्रीसोबत संपर्क झाला होता.

दूतावासाच्या मदतीने नुसरत हिला सुखरूप मायदेशी परत आण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. थेट विमान मिळत नसल्यामुळे तिला कनेक्टिंग फ्लाइटच्या मदतीने भारतात आणलं आहे.

कठीण प्रसंगानंतर अभिनेत्री भारतात परतल्यामुळे नुसरत हिच्या चाहत्यांनी आणि कुटुंबियांनी मोकळा श्वास घेतला आहे. सध्या संपूर्ण जगाचं लक्ष इस्त्रायलमध्ये होत असलेल्या युद्धाकडे आहे. पॅलेस्टाईनच्या हमास संघटनेने हल्ला केल्यानंतर इस्त्रायलने देखील प्रत्युत्तर दिलं आहे.