
परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा हे दोघे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा नुकताच 13 मे रोजी दिल्ली येथे साखरपुडा पार पडलाय.

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा हे दोघे सतत मुंबईमध्ये स्पाॅट होत होते. सतत चर्चा होत्या की, हे दोघे एक एकमेकांना डेट करत आहेत. मात्र, यांनी कधीच यांच्या नात्यावर जाहिरपणे भाष्य केले नाहीये.

आता साखरपुड्यानंतर परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा हे याच वर्षाच्या शेवटी लग्न बंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे. इतकेच नाही तर याचा सर्व प्लान देखील तयार असल्याचे सांगितले जात आहे.

रिपोर्टनुसार परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा हे दोघे लग्नानंतर हनिमूनला ग्रीस किंवा मालदिवला जाऊ शकतात असे सांगितले जात आहे. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या लग्नाची वाट पाहताना चाहते दिसत आहेत.

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांची पहिली भेट ही लंडनमध्ये झाल्याचे सांगितले जाते. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या साखरपुड्यासाठी प्रियांका चोप्रा ही भारतात दाखल झाली.