
स्वातंत्र्य दिनाच्या आधी 12 ऑगस्टला कारगिल युद्धाचा नायक कॅप्टन विक्रम बत्रा यांचं निर्भय, धैर्य आणि पराक्रम दाखवणारा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. विक्रम बत्रा हे शौर्याचे प्रतिक आहेत.

ट्रेलर रिलीजसाठी अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा, कियारा अडवाणी, दिग्दर्शक विष्णू वर्धन, निर्माते करण जोहर, अपूर्व मेहता, शब्बीर बॉक्सवाला आणि अॅमेझॉन प्राइम व्हिडीओचे दिग्दर्शक आणि कंटेंट प्रमुख विजय सुब्रमण्यम, जनरल वायके जोशी, जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ उपस्थित होते. सोबतच कारगिल विजय दिवसाठी कारगिलमध्ये संरक्षण कर्मचारी आणि जनरल बिपिन रावतही उपस्थित होते.

कारगिल युद्धामध्ये अधिकाऱ्यांच्या अमूल्य त्यागाला लक्षात ठेवण्यासाठी आणि भारताला मिळवून दिलेल्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी, या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होते.

कारगिल विजय दिनाच्या महत्त्वपूर्ण दिवशी अमेझॉन प्राइम व्हिडिओनं 'शेरशाह' या चित्रपटाचा खास ट्रेलर लाँच केला आहे.

धर्मा प्रोडक्शन्स आणि काश एंटरटेन्मेंट यांनी संयुक्तपणे बनवलेला चित्रपट 'शेरशाह' 12 ऑगस्ट 2021 रोजी 240 देश आणि प्रदेशात अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होईल.