
बॉलिवूडची फॅशनिस्ट मलायका अरोरा जेव्हा एखाद्या आउटफिटचा ट्राई करती तेंव्हा तिचे लूक हे बघण्यासारखे सुंदर असते.

मलायका अरोरा हिने नुकतेच एक फोटोशूट केले आहे. ज्याद्वारे तिने पुन्हा सिद्ध केले आहे की फॅशन सेन्सच्या बाबतीत तिला कोणीही चुकीचे सिद्ध करू शकत नाही.

मलायकाने लाँग बॉडीकॉन क्लासिक ब्लॅक ड्रेस घातला आहे. ज्यात ती खूप आकर्षक लुकमध्ये दिसत आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

जर मलायकाच्या या ड्रेसबद्दल बोलायचे झाले तर या ड्रेसची किंमत 72 हजार रुपये आहे. मलायकाच्या स्टायलिस्ट मेनका हरिसिंघानीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचे हे फोटो शेअर केले आहेत.

मलायकाचा हा बॉडीकॉन मिडी ड्रेस ऑस्ट्रेलियन फॅशन डिझायनर oni Maticevski च्या लेबलचा आहे. ज्यात चेक प्रिंट देण्यात आले आहेत.