
21 ऑक्टोबर रोजी लसीकरणाच्या बाबतीत भारतात इतिहास घडलाय. देशातील लोकांना 100 कोटी लसीचे डोस देण्यात आलेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी या निमित्ताने राष्ट्राला संबोधित केलं आहे. 100 कोटी डोस पूर्ण केल्यावर, पंतप्रधान मोदी म्हणाले की कोरोनाशी सामना करण्यासाठी आता देशाकडे मजबूत सुरक्षा कवच आहे.

28 कोटींपेक्षा जास्त लोकांचं लसीकरण पूर्ण : लसीकरणाच्या बाबतीत, फक्त चीन भारताच्या पुढे आहे, जिथे लोकांना 200 कोटींपेक्षा जास्त डोस दिले गेले आहेत. त्याचबरोबर 100 कोटी डोससह भारत दुसऱ्या स्थानावर आहे. लसीकरणाच्या बाबतीत अमेरिका, ब्राझील आणि इंडोनेशिया सारख्या देशांचा आलेख सपाट आहे. भारतात पूर्णपणे लसीकरण झालेल्या लोकांची लोकसंख्या 28 कोटींपेक्षा जास्त आहे. या प्रकरणात चीननंतर भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे.

अनेक समस्यांवर मात :100 कोटी व्हॅक्सिन डोस हा केवळ आकडा नाही. तर देशाच्या सामर्थ्याचं प्रतिबिंब आहे. नव्या अध्यायाची सुरुवात आहे. नव्या भारताची सुरुवात आहे. अवघड लक्ष्य पूर्ण करणाऱ्या भारताचं लक्ष्य आहे. भारताने 100 कोटींच लक्ष पूर्ण केलं आहे. त्याची इतर देशाशी तुलना केली जात आहे. त्याचं कौतुकही केलं जात आहे. आपण याची सुरुवात कशी केली हे महत्वाचं आहे. व्हॅक्सिनची निर्मिती करण्यात इतर देशांचा हातखंडा होता. आपणही याच देशांवर अवलंबून होतो. त्यामुळे भारतही त्यांच्यावर अवलंबून होता. महामारी आल्यानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले. भारत कोरोना व्हॅक्सिन तयार करेल का? भारत आपल्या देशातील लोकांची काळजी कशी घेणार? सर्वांना लस देईल का असे प्रश्न निर्माण झाले होते. पण भारताने सर्वांना लस दिली. मोफत दिली. कोणतीही रक्कम घेतली नाही, असं त्यांनी सांगितलं.

व्हीआयपी कल्चरला वाढू दिलं नाही : या लसीकरणामुळे जग भारताला अधिक सुरक्षित मानेल. संपूर्ण जग भारताची ताकद पाहत आहे. सबका साथ सबका विश्वासचं सर्वात मोठं उदाहरण आहे, असं सांगतानाच आजार सर्वांनाच होतो. त्यामुळे त्यावर व्हीआयपी कल्चरचा प्रभाव होऊ नये. केवळ व्हीआयपी लोकांनाच लस मिळू नये याची काळजी घेण्यात आली. कितीही श्रीमंत असला तरी त्याला सामान्य नागरिकांप्रमाणेच ट्रीटमेंट मिळेल हे पाहिलं. त्यामुळेच सर्वांना लस मिळू शकली असं ते म्हणाले.

देशात आता मजबूत सुरक्षा कवच आहे: पंतप्रधान मोदी : 100 कोटी डोस पूर्ण झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, '21 ऑक्टोबर 2021 चा हा दिवस इतिहासात नोंदला गेला आहे. भारताने काही दिवसांपूर्वी लसींचे 100 कोटी डोस देण्याचा टप्पा पार केला. हे भारताचे, भारतातील प्रत्येक नागरिकाचे यश आहे.

लसीकरणाशी संबंधित प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळाले : पीएम मोदी म्हणाले, जेव्हा 100 वर्षांची सर्वात मोठी महामारी आली, तेव्हा भारतावर प्रश्न उपस्थित होऊ लागले. भारत या जागतिक साथीच्या आजाराशी लढू शकेल का? इतर देशांमधून इतक्या लस खरेदी करण्यासाठी भारताला पैसे कुठून मिळतील? भारताला लस कधी मिळणार? भारतातील लोकांना लस मिळेल की नाही? साथीच्या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी भारत पुरेशा लोकांना लसीकरण करू शकेल का? विविध प्रश्न होते, पण आज हा 100 कोटी लसीचा डोस प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देत आहे.

'सर्वांना लस-फ्री लस' मोहीम सर्वांनी मिळून सुरू केली : आपल्या भाषणात पंतप्रधान म्हणाले की, कोरोना महामारीच्या प्रारंभी, भारतासारख्या लोकशाहीत या साथीचा सामना करणे खूप कठीण होईल अशी भीती व्यक्त केली जात होती. भारतासाठी, भारतातील लोकांसाठी असेही म्हटले जात होते की, इतका संयम, इतकी शिस्त येथे कशी चालेल? पण आपल्यासाठी लोकशाही म्हणजे 'सबका साथ'. ते म्हणाले, सर्वांना बरोबर घेऊन देशाने 'सर्वांसाठी लस-फ्री लस' ही मोहीम सुरू केली. गरीब-श्रीमंत, गाव-शहर, दूर, देशात एकच मंत्र आहे की जर रोगाने भेदभाव केला नाही तर लसीमध्ये कोणताही भेदभाव होऊ शकत नाही. त्यामुळे व्हीआयपी संस्कृती लसीकरण मोहिमेवर वर्चस्व गाजवू नये याची खात्री करण्यात आली.

PMJDY Bank Account


हा सण अत्यंत सावधगिरीने साजरा केला जावा : आपल्या भाषणात, पीएम मोदी म्हणाले, कितीही चांगले दिवस असले, तरी मी विनंती करतो की आपण आपले सण अत्यंत जागरूकतेने साजरे केले पाहिजेत. मोठी ध्येये कशी ठरवायची आणि ती कशी साध्य करायची हे देशाला माहीत आहे. परंतु, यासाठी आपण सतत सावधगिरी बाळगली पाहिजे. आपण निष्काळजी राहू नये.