
पूजा बत्रा आणि नवाब शाह यांनी दीर्घ नात्यानंतर लग्न केलंय. त्यांच्या लग्नाची बातमी ऐकून सर्वांनाच धक्का बसला होता. या दोघांनीही प्रदीर्घ सस्पेन्सनंतर चाहत्यांना लग्नाची बातमी दिली. आज पूजाच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तिच्या आणि नवाबच्या प्रेमकथेबद्दल सांगत आहोत.

नवाबबद्दल बोलताना पूजा म्हणाली होती की, “आम्ही कॉमन फ्रेंड्सच्या माध्यमातून भेटलो. आम्ही आमच्या आयुष्याच्या योग्य वेळी भेटलो. त्याच परिस्थितीत आम्ही भावनिक होतो. आम्हाला एकमेकांना समजावून सांगण्याचा फारसा प्रयत्न करावा लागला नाही. मला त्याच्याबद्दलची सर्वात चांगली वाटणारी गोष्ट म्हणजे तो एक कौटुंबिक व्यक्ती आहे.

त्याच वेळी, नवाब यांनी सांगितलं की, हा सर्व एक जादूचा अनुभव होता. आम्ही 20 वर्षांपासून एकमेकांना ओळखतो आणि नंतर आम्ही पुन्हा कनेक्ट झालो. जे काही घडले ते आमच्यासाठी चांगलेच होते. ती लॉस एंजेलिसहून परत येत होती आणि आमची भेट झाली. मग आम्ही एकत्र वेळ घालवला आणि मग हळूहळू आमचा बॉन्ड वाढू लागला.

प्रदीर्घ रिलेशनशिपनंतर नवाबने पूजाला कुटुंबियांसमोर प्रपोज केले होते. दोघांची खास गोष्ट म्हणजे दोघेही फिटनेसची पूर्ण काळजी घेतात आणि एकमेकांना पूर्णपणे सपोर्ट करतात.

तिच्या लग्नाबद्दल पूजाने एका मुलाखतीत सांगितले होते की, "आम्ही दिल्लीत लग्न केलं होतं, ज्यामध्ये फक्त कुटुंबातील सदस्य सामील होते. आमचे जवळचे मित्र आम्हाला विचारायचे की आम्ही आमच्या लग्नाला उशीर का करतोय. पण मी प्रवाहाबरोबर जात होते. तेव्हा मला समजले की नवाब माझ्यासाठी बनला आहे आणि मी माझे आयुष्य त्याच्यासोबत घालवणार आहे तेव्हा आम्ही लग्न केलं.