
सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे यांची चर्चा रंगली आहे. दोघे कायम सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असतात.

नुकतंच मुग्धा व प्रथमेशने देवदर्शन केलं. यामागचं कारण देखील खास होतं. दोघांच्या लग्नाला तीन महिने पूर्ण झाल्यामुळे दोघांनी 23 मार्चला देवदर्शन घेतलं.

मुग्धा - प्रथमेशने विजयादुर्गा देवीचं आणि माणगावातील श्री दत्त मंदिरात जाऊन दत्त महाराजांचं, श्रीमद् परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांचं दर्शन घेतलं.

मुग्धा - प्रथमेश यांचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. चाहते देखील दोघांच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

‘लिटिल चॅम्प्स’च्या मंचावर झालेली प्रथमेश-मुग्धा यांची पहिली ओळख लग्नापर्यंत पोहोचली. डिसेंबर 2023 मध्ये प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांचं लग्न झालं.