
मराठमोळी अभिनेत्री मिथिला पालकर सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालतेय. नवनवीन फोटो शेअर करत ती चाहत्यांशी कनेक्ट होण्याचा प्रयत्न करतेय.

मिथिला नुकतंच 'लिटिल थिंग्ज'च्या सीजन 4 मध्ये झळकली आहे. त्यामुळे ती आता या वेब सीरीजच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. ही वेब सीरीज नेटफ्लिक्सवर रिलीज झाली आहे.

मिथिलानं मराठीसोबतच हिंदी चित्रपट आणि वेबसिरीजमध्येसुद्धा आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. तिला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम मिळालं आहे.

आता मिथिलानं सुंदर साडीमधील हटके फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती कमालीची सुंदर दिसते आहे. तिचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत.

तिचे हे फोटो तिच्या चाहत्यांच्याही पसंतीस उतरत आहेत. या फोटोवर तिच्या अनेक चाहत्यांनी भरभरुन कमेंट्स केल्या आहेत.