
अभिनेत्री प्रियांका चोप्राने तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्याद्वारे तिने तिच्या चाहत्यांना नवीन वर्ष कसे साजरे केले याची झलक दाखवली आहे. या फोटोंमध्ये प्रियांका तिचा पती आणि गायक निक जोनाससोबत दिसत आहेत.

फोटोंमध्ये, प्रियंका तिचा पती निकसोबत बोटीवर एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसत आहे.

या फोटोमध्ये प्रियांकाही सोनेरी सूर्यकिरणांचा आनंद लुटताना दिसली आहे.

या फोटोंमध्ये प्रियांका आणि निकचे मित्र-मैत्रिणी बोटीवर धमालमस्ती करतानाही तुम्ही पाहू शकता.

नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करतानाचे फोटो शेअर करताना प्रियांकाने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘फोटो डंप… मित्र आणि कुटुंबियांचे खूप आभार. असे नवीन वर्ष साजरे करा. नवीन वर्षाच्या शुभेच्छा.’