
अभिनेत्री आणि मॉडेल राखी सावंत नेहमीच चर्चेत असते. बॉलिवुमध्ये तिचे असे वेगळे स्थान आहे. विशेष म्हणजे तिचे आणि बिग बॉसचे वेगळे असे नाते आहे.

राखी सावंतने बिग बॉस हिंदीच्या सिझन 1, 4 तसेच चौदाव्या सिझनमध्ये सहभाग घेतलेला आहे. सोबतच तिने बिग बॉस मराठीच्या चौथ्या सिझनमध्येही स्पर्धक म्हणून सहभाग नोंदवला होता. दरम्यान, राखी सावंतने सध्या चालू असलेल्या बिग बॉसच्या 19 व्या सिझनवर भाष्य केले आहे.

यावेळच्या बिग बॉसमध्ये जाणार का? असे विचारल्यावर राखी सावंतने बिग बॉस मला योग्य वेळी बोलावणार आहेत, असे म्हणत ती भविष्यात या रिअॅलिटी शोचा भाग होऊ शकते, असे संकेत दिले आहेत. सोबतच तिला जर या बिग बॉसच्या 19 व्या सिझनमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली? तर काय करणार, याचेही तिने भन्नाट उत्तर दिले आहे.

राखी सावंतने Bigg Boss 19 मधील श्रीमंत म्हणून ओळख असलेल्या तान्या मित्तलला टार्गेट केलं आहे. मी जर बिग बॉसमध्ये गेले तर तान्या मित्तलचं जगणं मुश्कील होऊन जाईल, असं राखी सावंत म्हणाली आहे. (तान्या मित्तल)

सोबतच मी बिग बॉसच्या घरात पाऊल ठेवताच अगोदर तान्या मित्तलच्या साड्यांना आग गावेन. तान्या मित्तल सोबत 600 साड्या घेऊन गेल्याचे बोलले जाते. तिने 600 साड्या नेल्या असतील तर मी सोबत 1000 साड्या घेऊन जाईल, असंही राखी सावंत म्हणाली आहे. (तान्या मित्तल)

दरम्यान, बिग बॉसचे हे पर्व चांगलेच रंगात आले आहे. असे असतानाच राखी सावंतला या सिझनमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली तर चांगली धम्माल उडू शकते, असे तिच्या चाहत्यांचे मत आहे. त्यामुळे भविष्यात नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (तान्या मित्तल)